७ डिसेम्बर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर येथे 30 वर्षीय युवकाची कोयता व लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याप्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोनाली अशोक चौधरी (रा. आदिवासी सोसायटी, क्रांतीनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की त्यांचा भाऊ नितीन शंकर शेट्टी (वय 33) हा त्याच्या घरासमोर उभा होता. त्यावेळी निळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा गाडीवर संशयित नागेश अशोक निसाळ, गणेश यादव लाखन हे हातात लोखंडी पट्टी, रोशन अशोक निसाळ यांनी धारदार शस्त्रे व त्याच्याबरोबरची दोन अनोळखी मुले तेथे आली.
त्यांनी नितीनच्या पल्सर गाडीची तोडफोड केली. त्यामुळे नितीन हा घराबाहेर आला असता त्याच वेळी आरोपी यादव लाखन हा हातात लाकडी काठी व राजेंद्र लाखन हा हातात लोखंडी पहार घेऊन आला. या सर्वांनी मिळून नितीनला मारहाण करून खाली पाडले. रोशन निसाळ याने धारदार शस्त्राने, राजेंद्र लाखन याने लोखंडी पहारीने, यादव लाखन याने काठीने, गणेश लाखन याने लोखंडी पट्टीने, तर नागेश निसाळ याने तेथे असलेल्या दगडाने नितीनच्या तोंडावर, मानेवर, हातावर व डोक्यावर गंभीर दुखापत करून त्याची हत्या केली.
हा प्रकार काल (दि. 6) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उंटवाडीजवळ आदिवासी सोसायटीत घडला. या प्रकरणी हत्या करणार्या टोळक्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar