सोशल मीडियावरील पोस्टवरून पिंपळगाव बसवंतला युवकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला
सोशल मीडियावरील पोस्टवरून पिंपळगाव बसवंतला युवकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- सोशल मीडिया वरील एका पोस्टवरून एका तरुणाला 20-25 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव बसवंतमध्ये घडली.

आर्यन बेगानीया असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात या युवकांच्या 2 बरगड्या तुटल्या असून तो अद्याप बेशुद्ध आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेच्या निषेधार्थ पिंपळगावचे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी पिंपळगाव बंदची हाक दिली. शहरात कडकडीत बंदही पाळण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपी असणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या तरुणाने इन्स्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याच्या मित्राने दुसऱ्याला शेअर केली होती. त्यावरून वाद होऊन मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतीत त्याला धमक्या पण आल्याचे समोर आले.

या प्रकारानंतर नागरिकांनी काही वेळ पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले होते. या घटनेवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, आज संपूर्ण शहरात बंद पाळण्यात आला. स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. यामध्ये मोर्चेकर्‍यांनी संशयित आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या प्रकरणी ६ संशयितांना पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात आहे. पोलिसांनी नागरिकांना दुकाने सुरु करण्याचे आवाहन केले आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group