आणखी सुसाट ! मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 2 तासांनी कमी होणार,  अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार
आणखी सुसाट ! मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 2 तासांनी कमी होणार, अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार
img
दैनिक भ्रमर
मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवडी-न्हावा शेवा सी लिंक हायवे, जो अटल सेतू म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याने मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी केला आहे, लवकरच सोलापूर आणि सातारा या द्रुतगती मार्गाने जोडला जाईल. या प्रकल्पासाठी 17,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या नवीन महामार्गामुळे अटल सेतू ते सोलापूर आणि सातारा असा थेट रस्ता उपलब्ध होईल, ज्यामुळे मुंबईआणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ आणखी कमी होईल. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्याअधिकाऱ्यांनी सांगितले आहे की नवीन महामार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्या नचा प्रवासाचा वेळ 75-90 मिनिटांनी कमी होईल.

नवीन प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जातील. हा 130 किमी लांबीचा एक्स्प्रेस वे चौक-पुणे-शिवरे जंक्शनपर्यंत पोहोचेल. जलद प्रवासासाठी या मार्गावर एकूण 8 लेन असतील. या रस्त्याच्या बांधकामासाठी 17500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या या महामार्गाची रूपरेषा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार करण्यात येत आहे

 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच अटल सेतूला जोडणाऱ्या आणखी एका महामार्गाची घोषणा केली होती. त्यानुसार अटल सेतूवरुन उतरल्यानंतर 14 लेन असणारा रस्ता तयार केला जाणार आहे. हा महामार्ग बंगळूरु आणि छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणार आहे. याशिवाय, हा रस्ता पुणे रिंग रोडशी कनेक्ट केला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.


इतर बातम्या
Join Whatsapp Group