मोठी बातमी : पोर्ट ब्लेअरला आता ''या'' नावाने ओळखले जाणार
मोठी बातमी : पोर्ट ब्लेअरला आता ''या'' नावाने ओळखले जाणार
img
दैनिक भ्रमर
केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून 'श्री विजयपुरम' करण्याची घोषणा केली आहे. सरकारने शुक्रवारी जाहीर केले की अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम असे करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजयपुरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते.’

खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे.  आम्ही पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजया पुरम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये शाह यांनी ही माहिती दिली आहे. देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीं संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजया पुरम' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शाहंनी म्हटले आहे.

श्री विजया पुरम हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले असल्याचे शाहंनी म्हटलेआहे. नेताजी सुभाषचंद्र बोसजी यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये केलेल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंतचे ठिकाणही हे बेट असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group