गेल्या काही दिवसांतच स्त्री 2 ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली आहे त्यामुळे हा सिनेमा सध्या जोरदार चर्तेत आहे. दरम्यान ,
सिनेमाचा कोरिओग्राफर जानी मास्टर वर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप करणारी महिला देखील कोरिओग्राफर आहे. जानीने अनेक महिन्यांपासून कधी सेटवर तर कधी घरात तिचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे
दरम्यान , महिला कोरिओग्राफरने केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जानी याने सिनेमाच्या सेटवर आणि आउटडोर शुटींगच्या वेळी तिचा विनयभंग केला. ही घटना 2019मध्ये घडली होती. याविरोधात बोलले तेव्हा इंडस्ट्रीतून बाहेर काढून टाकू अशी धमकी तिला देण्यात आली. त्यामुळे ती याविरोधात काहीच बोलू शकली नाही. जानीच्या साथीदारांकडून तिला धमकवण्यात आलं होत असंही तिनं सांगितलं.
जानी हा केवळ 21 वर्षांचा असून कोरिओफर जानी मास्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(n)506,323IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानी हा टॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.