पुण्यात हिट अँड रन ची  मालिका सुरूच, ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले
पुण्यात हिट अँड रन ची मालिका सुरूच, ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले
img
दैनिक भ्रमर
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात हिट अँड रन चा अनेक घटना सातत्याने  घडत असून या घटना थांबायचे नावच घेत नाही आहेत. दरम्यान, 
पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. कार चालकाच्या धडकेत एक 21 वर्षीय तरुण दुचाकीस्वार ठार झाला आहे. या घटनेनंतर आरोपी कारसह फरार झाला. 

कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डिंग समोर मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ऑडी कारने एका दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली. कार चालकाच्या शेजारी बसलेली व्यक्ती ही सिगारेट फुंकत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

दरम्यान, कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुचाकीस्वाराल धडक दिल्यानंतरही आरोपीने कार थांबवली नाही. त्याने जखमीला कार खाली चिरडले आणि भरधाव वेगाने फरार झाला. रौफ अकबर शेख असे या हिट अॅण्ड रन मध्ये बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. अपघातात बळी गेलेला रौफ शेख स्विगी डिलीवरीचे काम करायचा. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group