अकोला शहरातल्या हरिहर पेठमध्ये पुन्हा राडा
अकोला शहरातल्या हरिहर पेठमध्ये पुन्हा राडा
img
दैनिक भ्रमर
अकोल्यात दोन दिवसांपूर्वीदेखील वाद झाला होता. या परिसरात रिक्षा आणि बाईकची धडक झाली होती. त्यामुळे वाद झाला होता. या शुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या वादाचं रुपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. दरम्यान, हरीहर पेठेत दोन गटात पुन्हा वाद झाल्याची माहिती आहे.त्यामुळे हरीहर पेठेत पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी आजच्या घटनेनंतर 17 जणांना ताब्यात घेतलं आहे.

 दरम्यान, दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना ही एका शुल्लक कारणावरुन झाली होती. दरम्यान, आज जी घटना घडली त्या वादामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात आता तणावपूर्ण शांतता आहे. दोन दिवसांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. यानंतर आज पुन्हा वाद झाला. संबंधित घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांकडून आता काळजी घेतली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group