धक्कादायक  ! तळोजा कारागृहात पोलीस कर्मचारी कैद्यांना करायचा अंमली पदार्थांचा पुरवठा
धक्कादायक ! तळोजा कारागृहात पोलीस कर्मचारी कैद्यांना करायचा अंमली पदार्थांचा पुरवठा
img
दैनिक भ्रमर

तळोजा कारागृहातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे एक पोलीस कर्मचारीच कैद्यांना अमली पदार्थ पुरवत होता. जेवणाच्या डब्यातून चरस, एमडीएमए व गांजा यांसारखे अमली पदार्थ जेवणाच्या डब्यातून लपवून घेऊन जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यास तपासणी दरम्यान पकडण्यात आले आहे. प्रकरण उघडकीस येताच या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गांजा आणि चरस असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तळोजा कारागृहात तैनात असलेल्या एका हवालदाराने बुधवारी सायंकाळी रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशात काहीही सापडले नाही. मात्र जेवणाच्या टिफिनची झडती घेतली असता त्यामध्ये १० लाख ८ हजार रुपये किमतीचे गांजा, चरस आढळून आला आहे, खारघर पोलीस ठाण्यात चौकशीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं, त्यानंतर खारघर पोलिसांनी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या कॉन्स्टेबल अनिल जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group