सावध !  ''या'' कारणाने लहान मुलांमध्ये वाढतोय ''हा'' आजार
सावध ! ''या'' कारणाने लहान मुलांमध्ये वाढतोय ''हा'' आजार
img
दैनिक भ्रमर
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचे परिणाम लहान मुलांपासून ते मोठ्यांमध्येही परिमाण दिसू येत आहेत. आजनकालचे मुलेही काळानुसार अतिप्रमाणात अक्टिव्ह दिसत आहेत. बऱ्याचशा लहान मुलांमध्ये वाचन आणि लिहिण्यात अडचण पाहायला मिळते. काहींमध्ये ते कमी आणि काहींमध्ये जास्त असू शकते. यामध्ये बहुतेक पालक हे मुलांच्या वाचन आणि लिहिण्याच्या क्षमतेचा त्यांच्या बुद्धिमत्तेशी संबंध जोडतात. 

मात्र, काहीवेळा मुलांमध्ये वाचन आणि लिहिण्यात समस्याही मानसिक डिस्लेक्सियाचे कारण असू शकतात. याला शिकण्याची अक्षमता किंवा लर्निंग डिसएबिलिटी म्हणतात. हा नेमका काय आजार आहे, यावर उपाय काय आहेत, याचबाबत आपण जाणून घेऊयात.

एका मानससोपचार तज्ज्ञांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक मुलांना वर्गामध्ये लिहिता वाचता येत नाही. त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितले किंवा कितीही शिकवले तरी त्या मुलांना ते करता येत नाही. यामध्ये मुलांचा काही दोष नसतो, त्यांना लर्निंग डीसऑर्डर हा आजार असल्याने अशा गोष्टी होतात.

डिस्लेक्सिया यामध्ये मेंदूच्या लिहिण्या, वाचण्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे मुलांच्या अक्षरे ओळखण्यात गडबड होते अथवा ते उशिरा शिकतात. अचूक वाचन, सहज वाचन आणि आकलन यावर परिणाम दिसतो. ज्या मुलांना लर्निंग डिसऑर्डर हा आजार आहे, अशा मुलांवर विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

लक्षणे -

वाचता न येणे, लिखाण करण्यात अडचण येणे, उशिरा बोलणे, कोणतीही गोष्ट समजण्यात आणि लक्षात ठेवण्यात अडचण येणे, अतिचंचलपणा, खूप रागीट स्वभाव असणे ही डिस्लेक्सियाची काही लक्षणे आहेत. दृष्टी, श्रवणदोषाबरोबरच डिस्लेक्सिया असू शकतो. डिस्लेक्सियासाठी जेनेटिक कारणही असू शकते. मुले कायम आजारी पडत असतील, मुले अतिचंचल असतील, घरात कमी शिक्षणाचे वातावरण असेल तरीही मुलांमध्ये हा त्रास उद्भवू शकतो.

ज्या मुलांना हा आजार आहे, अशा मुलांकडे व्यवस्थित लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी त्यांना व्यवस्थित शिकवण गरजेचे आहे, जेणेकरून त्या मुलांना शिकायला मदत होईल आणि त्यांचे भवितव्य हे सुरक्षित होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group