मोदी सरकार च्या काळात रेल्वेत विशेष बदल : रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव
मोदी सरकार च्या काळात रेल्वेत विशेष बदल : रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): गेल्या 40 वर्षांत रेल्वेत अपेक्षित बदल झाले नसले तरी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात रेल्वेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी केले.

ते नाशिकरोड येथील सामनगाव येथील आर पी एफ च्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आर पी एफ चे महासंचालक मनोज यादव यांनी केले. यावेळी वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त कमांडर जतीन बी राज यांच्या नेतृत्वात परेड आयोजित करण्यात आली, ज्याचे मंत्री वैष्णव यांनी कौतुक केले.

मंत्री वैष्णव पुढे म्हणाले, "2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर रेल्वेला विशेष महत्व दिले गेले. नवीन तंत्रज्ञानासाठी 2.5 लाख कोटी रुपयांचा निधी दिला गेला, ज्यामुळे रेल्वे जाळा 40,000 किलोमीटरने वाढला."

तसेच, त्यांनी गरीब आणि मध्यम वर्गीय नागरिकांसाठी जनरल बोगीच्या कामाबाबत माहिती दिली, ज्यासाठी सध्या 12,500 कोटी रुपयांचे काम सुरू आहे.

विरोधकांनी रेल्वेचे खाजगीकरण होईल अशी अफवा पसरवली आहे, परंतु मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, रेल्वेचे खाजगीकरण होणार नाही. त्यांनी विरोधकांना सल्ला दिला की, "रेल्वे आणि संरक्षण विभागावर राजकारण करू नका, कारण हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत."

जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे जाळा वाढवण्यास विशेष लक्ष दिले गेले असून, नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. आर पी एफच्या कार्याचे कौतुक करताना मंत्री वैष्णव यांनी 35 कोटी रुपयांचा निधी बुलेटफ्रूफ जॅकेट आणि इतर सुविधांसाठी जाहीर केला.

"आर पी एफ मधील डॉग ट्रेनिंग सेंटरसाठी विशेष प्रयत्न केले जातील," असे त्यांनी सांगितले. "वांदेभारत आणि नमो भारत या गाड्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे."

कार्यक्रमाच्या शेवटी आर पी एफ चे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांनी आभार व्यक्त केले, आणि त्यानंतर मंत्री वैष्णव यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकास भेट देऊन त्याची पाहणी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group