आईनं दुसरं लग्न केलं, अनाथ आश्रमात सोडलेल्या 8 वर्षांच्या चिमुकल्यानं आयुष्यच संपवलं...
आईनं दुसरं लग्न केलं, अनाथ आश्रमात सोडलेल्या 8 वर्षांच्या चिमुकल्यानं आयुष्यच संपवलं...
img
दैनिक भ्रमर
भाईंदर येथे एका 8 वर्षीय मुलाने धक्कादायक पाऊल उचलत स्वतःचे आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या चिमुकल्यानं विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे. आईनं दुसरं लग्न केलं, आईनं दुसरं लग्न केल्यानंतर या आठ वर्षांच्या चिमुकल्याला एका अनाथ आश्रमात ठेवण्यात आलं. जेव्हा या मुलाची आई त्याला भेटायला आली, तेव्हा चिमुकल्यानं अनाथ आश्रमात राहण्यास नकार दिला. मला इथून घेऊ चल, मला इथे राहायचं नाहीये असं तो आपल्या आईला म्हणत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलगा गेल्या कित्येक महिन्यापासून मीरा-भाईंदर येथे असलेल्या केअरिंग हँड्स सेवा कुटीर अनाश्रमात राहत होता. 

सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेव्हा अनाथाश्रमातील सर्व मुलं झोपायला गेले तेव्हा तोदेखील त्यांच्यासोबत गेला होता. मंगळवारी सकाळी जेव्हा मुलांची हजेरी घेतली तेव्हा एक मुलगा बेपत्ता होता. तेव्हा अनाथाश्रमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा अंगणात असलेल्या विहिरीत मुलाचा मृतदेह सापडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 8 महिन्याआधी मुलाच्या आईने त्याला अनाथाश्रमात सोडलं होतं. मुलाच्या  आईने दुसरं लग्न केले होते. ती त्याच्यासोबतच राहात होती. मात्र, आर्थिक स्थिती बेताची असल्याने तिने मुलाला अनाथअश्रमात सोडलं होतं. मात्र, त्याला सतत आईची आठवण येत राहायची. त्यातूनच त्याने हे पाऊल उचललं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group