अजित दादा बारामतीतूनच लढणार ? त्यांनी स्पष्टच केले.. म्हणाले
अजित दादा बारामतीतूनच लढणार ? त्यांनी स्पष्टच केले.. म्हणाले
img
दैनिक भ्रमर
 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ही  जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान,अजित पवार हेलोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना मताधिक्य न दिल्याने नाराज होऊन अजित पवार हे  बारामती मतदारसंघातून न लढता शिरूरमधून विधानसभा लढतील, अशा चर्चा गेल्या दोन तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र सोमवारी रात्री बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात बारामतीमधूनच लढणार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की , आजपर्यंत बारामतीसाठी मी हजारो कोटींची कामे केली. त्यामुळे घडाळ्यासमोरचे बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करा. तुमच्या मनातला उमेदवार घड्याळ घेऊन बारामतीत उभा राहील, असे अजित पवार म्हणाले. उपस्थितांनी उमेदवाराचे नाव घोषित करा, असा आग्रह केल्यानंतर लोकांच्या मनात कोण आहे, याबद्दल मला सर्व्हे करावा लागेल, असे हसत हसत अजित पवार म्हणाले. तसेच, गहाळ राहू नका, जो मोठ्याने माझ्या नावाची घोषणा देतो, त्याचाच बूथ मागे राहतो, असे माझे निरीक्षण आहे, असे चिमटेही त्यांनी कार्यकर्त्यांना काढले.

दरम्यान, अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षाची कोअर कमिटी निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी याआधीच सांगितले आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार उमेदवार असणार आहेत. किंबहुना युगेंद्र पवार यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. बारामतीची लढाई भावाभावात होईल, अशीही चर्चा बारामतीत आहे. त्यामुळे अजित पवार बारामतीमधून लढले नाही तर कुठून लढणार, याविषयी पक्षात विविध चर्चा सुरू होत्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group