खुशखबर ! एसटीतील लिपिक- टंकलेखक संवर्गाच्या पदोन्नती धोरणाबाबतची स्थगिती उठविली
खुशखबर ! एसटीतील लिपिक- टंकलेखक संवर्गाच्या पदोन्नती धोरणाबाबतची स्थगिती उठविली
img
दैनिक भ्रमर
ST कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसटीतील लिपिक- टंकलेखक संवर्गाच्या पदोन्नती धोरणाबाबतची स्थगिती उठविली असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आह. एसटीतील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम संवर्गातील कर्मचा-यांना लिपिक-टंकलेखक संवर्गात पदोन्नती देण्याबाबत ९ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थगिती देण्यात आलेली होती. मात्र ही स्थगिती आता उठविण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. असे आदेश राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

याबाबतच्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, लिपिक, टंकलेखक या संवर्गात ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ज्या विभाग अथवा घटकातील पदोन्नतीची कार्यवाही स्थगित ठेवण्यात आलेली आहे. त्या विभागातील पदोन्नतीची कार्यवाही स्थगिती दिलेल्या टप्यापासून पुढे सुरु करावी. पात्र यादीतील कर्मचा-यांना प्रथम प्राधान्य देऊन पात्रता यादीनुसार सेवाजेष्ठतेप्रमाणे नेमणुकीबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

तसेच ज्या विभागातील कार्यवाही अपूर्ण अथवा स्थगित करण्यात आलेली आहे किंवा कार्यवाही पूर्ण केलेली आहे. अशा सर्व विभागातील ज्या कर्मचा-यांनी विहित मुदतीत अर्ज केले होते. तथापि, संप कालावधीमुळे ते कर्मचारी २४० दिवसाची उपस्थितीची अट पूर्ण करु शकत नाहीत. अशा कर्मचा-यांबाबत कर्मचारीवर्ग खाते परिपत्रक क्र. २८/२०१९( २८ जून २०१९) नुसार निश्चित केलेल्या प्रवर्गातील कर्मचा-यांना लिपिक -टंकलेखक या संवर्गामध्ये
खातेअंतर्गत २५ टक्के पदे पदोन्नतीने भरण्याकरीता अटी व निकष ठरविण्यात आलेले आहेत.

दरम्यान , त्यामध्ये जे कर्मचारी सन २०२१ व सन २०२२ या वर्षाकरीता २९ ऑक्टोबर २०२१ ते २३ एप्रिल २०२२ या संपकालावधीतील गैरहजेरीच्या कारणामुळे त्यांची विहित अटी नुसार लगतच्या ३ वर्षात २४० दिवस उपस्थिती नसल्याने ते पदोन्नतीस अपात्र होत आहेत, अशा कर्मचा-यांच्या बाबतीत सन २०२१ व सन २०२२ या वर्षातील २४० दिवस उपस्थितीची अट वगळता इतर सर्व अटीची पुर्तता करुन जागेची उपलब्धता व बिंदुनामावलीसह सर्व अटीमध्ये पात्र होतात, त्यांच्याबाबतीत फक्त एकवेळची बाब म्हणून फक्त २९ ऑक्टोबर २०२१ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीकरीता २४० दिवस उपस्थितीच्या अटीमध्ये शिथिलता देण्यात येत आहे.

उपरोक्त नमूद सूचनांची अंमलबजावणी करताना पत्र क्र. राप / कर्मवर्ग / म.ब. / २४९८ ( १० सप्टेंबर २०२०) मधील सूचनांचे पालन करण्यात यावे. ‘लिपीक-टंकलेखक’ पदी पदोन्नतीची कार्यवाही ही यापुढे कायमस्वरुपी राबवायची आहे. त्यामुळे ज्या महिला कर्मचा-यांनी प्रसूती व बालसंगोपन पगारी रजा उपभोगली असल्याने तसेच काही कर्मचारी वैद्यकीय रजेवर असल्याने लगतच्या ३ वर्षात प्रत्येकी २४० दिवस उपस्थिती भरत नाही , त्यांच्याबाबत ज्या दिवशी संबधित कर्मचारी २४० दिवस उपस्थितीची अट पूर्ण करतील त्यावेळेपासून त्यांचा समावेश अंतिम सामाईक ज्येष्ठता सूचीमध्ये करावा. त्यापुढे त्यांची सेवाज्येष्ठता ग्राहय धरण्यात यावी. या बाबी विचारात घेऊन संबधित प्रकरणी कार्यवाही करण्यात यावी.असेही या पत्रात म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group