मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.महाष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आजपासून अहिल्यानगर झाला आहे. राज्य शासनाने त्यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे.
अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर ९ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात तसे नमूद करण्यात आले आहे.