आगामी विधानसभा निवडणुकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा परिणाम राज्यातील इतर काही निवडणुकांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीआधी काही जिल्ह्यांत जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणूका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात २९ हजारपेक्षा जास्त निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका सातत्याने काही महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत आहेत. आता मात्र विधानसभा निवडणुकीचे कारण देत या सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यात सध्या ७ हजारांपेक्षा जास्त सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. साधारण पुढील महिन्यात त्या निवडणुका होण्याची शक्यता होती. त्यामध्ये दूध संघ, बाजार समिती, पतसंस्था, जिल्हा बँक अशा काही निवडणुका घेण्यात येणार होत्या. आता या निवडणुका वर्षाअखेरीस पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे कदाचित या निवडणूक आता नवीन वर्षातच होण्याची शक्यता आहे.
यावर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच निवडणुकीच्या पूर्वतायरीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सहकार विभागतील अधिकारी/कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत केल्यास सहकारी संस्थांच्या या निवडणुका होण्यात अडचण निर्माण होऊ शकते. यासंदर्भात विचार करून या निवडणूका ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलणे योग्य ठरेल अशी शासनाची धारणा असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, राज्यात २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका या ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.