यंदाचा 'बिग बॉस मराठी चा पाचवा सीजन चांगलाच गाजला असून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. दरम्यान, या सीजन चा मोस्ट अवेटेड ग्रँड फिनाले पार पडत आहे. या फिनाले मध्ये जान्हवी किल्लेकर हिने मोठी खेळी खेळली आहे .
बिग बॉस सीजन पाचचा ग्रँड फिनाले पार पडत आहे. या फिनालेमध्ये इलिमिनेशन कार्य पार पडत आहे. ग्रँड फिनालेमध्ये अभिजीत सावंत, अंकिला वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक होते. अखेर ग्रँड फिनाले सुरु झाला आहे आणि या ग्रँड फिनालेमधून सहावा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. ही सहावी स्पर्धक जान्हवी किल्लेकर आहे. पण जान्हवी किल्लेकर बाद झाली असली तरी 9 लाख रुपयांची बँग घेऊन ती घराबाहेर पडली आहे.
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत आज एक टास्क पार पडला. यावेळी सहाही स्पर्धकांना एक ऑफर देण्यात आली. सर्व स्पर्धकांना गेम सोडण्यासाठी 7 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. सर्व स्पर्धकांपैकी कुणीतरी एकाने गेम सोडला तर त्याला 7 लाख रुपये मिळतील, अशी ऑफर देण्यात आली. पण सर्व स्पर्धकांनी ती ऑफर नाकारली. यानंतर बिग बॉसने या टास्कमध्ये आणखी एक ट्विस्ट आणला. बिग बॉसने आणखी 2 लाख रुपये वाढवत जो स्पर्धक पळत जाऊन बझर वाजवेल तो स्पर्धक 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडेल, असं जाहीर करण्यात आलं.
बिग बॉसची ही ऑफर ऐकल्यानंतर जान्हवी आपल्या जागेवरुन बाहेर पडली. ती बझरच्या दिशेला गेली. ती बझर जवळ गेली आणि त्याला रडू आलं. यावेळी रितेश देशमुख यांनी तिला तिच्या रडण्यामागचं कारण विचारलं. यावेळी जान्हवी हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आपल्या डोळ्यांसमोर आपला प्रवास आठवत असल्याचं ती म्हणाली. आपण घरात सुरुवातीला वर्षा उसगांवकर आणि पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला. नंतर आपण बदललो. पण आपल्यावरती प्रेक्षकांचा असलेला रोष अजूनही पाहिजे तसा कमी झालेला नाही. त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं जान्हवीने स्पष्ट केलं. यानंतर जान्हवीने बझर वाजवला आणि ती 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली.