चालत्या ट्रेनमधून स्टंट करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर बघायला मिळत असतात. काही लोकं जीवाची पर्वा न करता स्टंट करताना दिसतात जे त्यांना चांगलेच महागात पडतात. एवढेच नव्हे तर वेळ प्रसंगी ते जीवावरही बेततात. दरम्यान अशीच एक घटना तामिळनाडू येथे घडली आहे. चालत्या ट्रेन मध्ये स्टंट करणे एका तरुणाला भोवलं आहे.
तामिळनाडूतील चेन्नई येथून एक हृद्रद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगा चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसत आहे चाली करताना दिसत आहे. पण काही वेळातच त्याच्या सोबत असं काही घडत जे पाहून सर्वांनाच धक्का बसेल.
माहितीनुसार, माधवरम येथील 16 वर्षीय अभिलाष हा एका महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचा प्रविद्यार्थी आहे. बुधवारी अभिलाष त्याच्या मित्रांसह इलेक्ट्रिक ट्रेनमधून प्रवास करत होता. stunt on moving train ट्रेन रोयापुरम आणि वॉशरमनपेट दरम्यान असताना अभिलाष ट्रेनच्या फूटबोर्डवर स्टंट करू लागला. त्याचवेळी अभिलाषचे मित्र त्याचा व्हिडिओ शूट करत होते
त्यानंतर अचानक अभिलाषचे डोके रुळाच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळले. यानंतर त्याला स्टेनली सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. stunt on moving train या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. माहितीनुसार, मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.