"या" अभिनेत्रीने घेतला संन्यास ; नावही बदलले
img
दैनिक भ्रमर
90 च्या दशकातील प्रसिद्ध  बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. शुक्रवारी त्यांनी प्रयागराजमधील संगम तटावर पिंडदान केले. आता त्यांना यमाई ममता नंद गिरी असे संबोधले जाईल. फक्त त्यांचा पट्टाभिषेक बाकी आहे. ममता आज सकाळीच महाकुंभातील किन्नर आखाड्यात पोहोचल्या होत्या.  अभिनेत्री सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. याविषयी तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली. ममता कुलकर्णीला आजपासून नवीन नाव दिलं जाईल. ममता कुलकर्णी आता श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जाईल. जुना आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले आहेत.

दरम्यान, ममता कुलर्णीने संन्यास घेतल्यानंतरचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव पहायला मिळतोय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group