वाल्मिक कराडचा मांजरसुंब्याला 9 एकर जमिनीवर आलिशान रिसॉर्ट उभारण्याचा होता प्लॅन, शेतकऱ्यांही  दिला त्रास
वाल्मिक कराडचा मांजरसुंब्याला 9 एकर जमिनीवर आलिशान रिसॉर्ट उभारण्याचा होता प्लॅन, शेतकऱ्यांही दिला त्रास
img
दैनिक भ्रमर
खंडणी हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची सिआयडी कडून चौकशी सुरु असून सध्या या  वाल्मिक कराडबद्दल अनेक खुलासे  होत आहेत. याचदरम्यान आता वाल्मिक कराड विषयी आणखी एक माहिती समोर येत आहे.  आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावाने बीडच्या मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन असल्याचं समोर आलं आहे. या जमिनीवर रिसॉर्ट उभारण्याची तयारी सुरू होती. मात्र, केवळ 9 एकरच नव्हे, तर या परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.           

वाल्मीक कराड यांच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात 9 एकर जमीन असून, परिसरात एकूण 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. 

या प्रकरणात आता मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. शेतकरी मुकेश रसाळ यांनी आरोप केला आहे की, ज्योती जाधव यांनी त्यांच्या शेतातील मुरुम उपसा करून स्वतःच्या शेतात भरला.जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू झाला. आमच्या शेतातील मुरुम उपसा केला. आम्ही प्रशासनाकडे तक्रार दिली होती, पण अजून कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान , शेतकऱ्यांनी 2024 च्या जुलै महिन्यापासूनच प्रशासनाकडे तक्रार केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.


इतर बातम्या
Join Whatsapp Group