आजकाल सोशल मीडिया चा जमाना असून याचे फायदे तसेच अनेक तोटेही आहेत. आजकल सोशल मीडियावरून आपण अनेक अनोळखी लोकांशी जोडले जातो. पण यातले काही लोक किती धोकादायक आणि हैवान वृत्तीचे असतात याची कल्पना कोणी करू शकत नाह. कारण असाच सोशल मीडिया चा ओळखतीतून झालेली मैत्री एका महिलेला खूप महागात पडली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
27 वर्षांच्या महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा तसंच महिलेला सिगरेट आणि गरम तव्याचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये घडला आहे. फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर आरोपी पीडित महिलेला घेऊन लॉजवर गेला आणि त्याने महिलेचा चोरून व्हिडिओ काढला. यानंतर आरोपीने लग्न कर नाहीतर, व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकीही दिली.
याप्रकरणी पोलिसांनी 38 वर्षांचा आरोपी आणि त्याच्या कुटुंबातल्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2021 साली आरोपी आणि पीडित मुलीची मैत्री झाली, त्यानंतर दोघंही लॉजवर गेले आणि आरोपीने पीडित तरुणीचा प्रायव्हेट व्हिडिओ काढला. लग्न केलं नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. यानंतर मुलीने आरोपीशी लग्नही केलं.
मिळालेल्या माहितीनुसार , लग्न झाल्यानंतर आरोपी आणि त्याची आई पीडित महिलेला घेऊन मध्य प्रदेशच्या ग्वालियरला गेले. तिकडे जाऊन त्यांनी महिलेचे डोक्याचे आणि डोळ्यावरचे केस कापले आणि तिला घरामध्ये बंधक बनवून ठेवलं. बंधक बनवलेलं असताना महिलेला सिगरेटचे चटके देण्यात आले आणि गरम तव्याने मारलं गेलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीने महिलेचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि तिच्या इतर कागदपत्रांचा गैरवापर करून कर्जही घेतलं. तसंच वडिलांकडून पैसे आणले नाहीत तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही तिला दिली गेली. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.