पैशांच्या वादातून चाकूने खुनी हल्ला केल्या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल
पैशांच्या वादातून चाकूने खुनी हल्ला केल्या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
लासलगाव :- निफाड तालुक्यातील कोळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवातील पैशांच्या वादातून चाकूने आणि कोयत्याने खुनी हल्ला केल्या प्रकरणी चार जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत विवेक केशव मोरे (रा कोळगाव) यांच्या फिर्यादीवरून नितीन सुनिल जाधव, शुभम सुनिल जाधव, मयुर सुनिल जाधव (सर्व रा. कोळगाव, ता. निफाड) व अभिषेक संजु साठे (रा. सुभाषनगर, कोपरगाव, जि. अहिल्यानगर) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दि. 15 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गोदावरी फिल्टर प्लँटजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवातील पैशांच्या कारणावरुन वाद झाला होता. विवेक मोरेचा भाऊ अजय हा गावात जात असतांना चौघांनी  संगनमत करुन पैशांच्या भांडणाची कुरापत काढून अजय यास शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या हातातील कोयत्याने अजयच्या डोक्यात मारहाण केली.

तसेच  हातातील चाकुने विवेकच्या भावाच्या उजव्या पायाचे मांडीवर तसेच डाव्या हाताच्या करंगळीवर वार केला. तेव्हा विवेक व त्याची वहिणी सुवर्णा हे सोडविण्यासाठी मध्ये पडली असता हातातील कोयत्याने विवेक मोरेच्या उजव्या पायाचे गुडघ्यावर वार केला. हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर, पाठीवर मारहाण केली. याबाबत भारतीय संहिता कलम २०२३ चे कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१ (३), ३(५) प्रमाणे लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ  करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group