हर्षा रिचारिया महाकुंभातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्ध झाल्या. हर्ष या गेल्या आठवड्यात निरंजनी आखाड्याच्या पेशवाईत संतांसह रथावर बसल्या होत्या. त्यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागले. गुगलच्या ट्रेडींगमध्ये हर्षा आल्या. इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्स अवघ्या तीन दिवसांत साडेपाच लाखांवरून दहा लाखांवर गेले. हर्षा या यूट्यूबर आहेत. त्यांचा जन्म झांसीमधील मऊरानीपुर येथे त्यांचा परिवार भोपाळमध्ये गेला. त्यांनी निरंजनी अखाडेचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि यांच्याकडून गुरू दीक्षा दिली. दरम्यान आता या सुंदर साध्वी ने महाकुंभ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी अमृत स्नान दरम्यान भगवा वस्त्र परिधान करुन त्यांनी गंगेत डुबकी लावली होती. त्यानंतर वाद वाढला.वाद वाढल्यानंतर त्यांनी कुंभनगरी सोडली. दरम्यान, महाकुंभ सोडण्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला. त्यांनी कुंभ सोडण्यासाठी स्वामी आनंद स्वरूप यांना जबाबदार ठरवले.
ज्योतिष पीठ पीठाधीश्वर एवं शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी हर्षा रिचारिया यांच्यावर टीका करत सनातन धर्माचा अवमान केल्याचा म्हटले. आनंद स्वरूप यांनी हर्षा यांच्या विरोधात मोर्चा उघडला. मॉडेल हर्षा यांनी भगवी वस्त्र परिधान करुन त्यागाच्या परंपरेस भोगाची परंपरा बनवली, असे म्हटले. संताकडून त्यांना विरोध होत असल्यामुळे त्यांनी कुंभनगरी सोडण्याचा निर्णय घेतला.
हर्षा यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एक मुलगी धर्मासोबत जुळण्यासाठी आली होती. धर्म समजून घेण्यासाठी आली होती. सनातन संस्कृती समजण्यासाठी आली होती. परंतु कुंभात थांबू नये, अशी परिस्थिती माझ्यासाठी निर्माण केली गेली. कुंभ माझ्या जीवनात एकवेळा येणार होता. परंतु तो अधिकार माझ्याकडून हिरावून घेतला आहे. त्याचे पुण्य तर माहीत नाही, परंतु ज्या लोकांमुळे महाकुंभ सोडावे लागत आहे, त्यांना पाप लागणार आहे. आपल्या गुरुंचा अपमान होण्याचे पाहू शकत नाही. त्यामुळे मी कुंभ नगरी सोडून जात आहे.
संत आनंद स्वरूप यांनी माझ्या आणि माझ्या गुरुदेवांविरुद्ध ज्या प्रकारे अपशब्द वापरले आहेत, त्यांना तसे करण्याचा अधिकार नाही. माझे गुरुदेव जिथे आहेत तिथे तुम्ही पोहोचू शकत नाही. हे प्रकरण यापेक्षा पुढे गेले तर मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करेन, असे हर्षा रिचारिया यांनी म्हटले आहे.