नाशिक : राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती बाबतअद्याप चर्चा झालेली नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे भाजपाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. नाशिक दौऱ्यावर आले असता महाजन पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील.
द्वारका येथे झालेल्या अपघातातील जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. पालकमंत्री जाहीर करायला उशीर झाला आहे. मकरसंक्रात जाऊ द्या त्यानंतर निर्णय होईल. कुंभमेळ्यासाठी ज्या जमिनी घेतल्या त्यांना पैसे दिले पाहिजे. मूळ मालका ऐवजी दुसऱ्यांना पैसे दिले असेल तर चौकशी झाली पाहिजे. मनपा आयुक्त चौकशी करतील. काय कारवाई होते लवकर दिसेल. बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहे. ज्या मागण्या झाल्या त्यानुसार काम सुरू आहे.
सर्वांची चौकशी सुरू असून, चौकशीत दिरंगाई होणार नाही. एकनाथ खडसे यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. आम्ही कुणाचेही दुश्मन नाही. दररोज एकमेकांना भेटतो. काही बाबतीत मतभेद असतात, परंतु सर्वांशी गोड बोलत असतो. बांगलादेश जन्म दाखला प्रकरणी मुख्यमंत्री यांनी विषय गांभीर्याने घेतला आहे. बांगलादेश मधून आलेल्या लोकांना आपले लोकप्रतिनिधी प्रमाणपत्र देत असेल तर चुकीचे आहे. त्याबाबत तपास सुरू असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून, नेते सैराट झाले असल्याचे महाजन यावेळी म्हणाले. एकमेकांवर आरोप सुरू असून, आघाडी तुटली आहे, ते एकत्र राहणार नाही. केवळ काही कुटुंब वाचविण्यासाठी आघाडी होती.
संपूर्ण देशात आघाडी राहिली नसल्याचे महाजन यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेमेळा
संदर्भामध्ये बोलताना सांगितले की, सध्या प्रयागराज येथे कुंभपर्व चालू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी लवकरच आम्ही सर्व जाणार आहोत. त्यातील सर्व गोष्टींचा विचार करून आलेले अडथळे कसे दूर करून मार्ग काढता येईल यावर देखील विचार विनिमय होणार आहे तसेच स्पष्ट केले.