एका सरकारी शाळेतील कार्यवाहक मुख्याध्यापक आणि शिक्षिकेने अश्लील कृत्य केले असल्याचा प्रकार घडला आहे.हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चित्तोडगढ जिल्ह्यातील गंगार ब्लॉकमधील ग्रामपंचायतीच्या सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एका शाळेतील शिक्षिकेशी गैरवर्तन करत होते. त्यानंतर घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने दखल घेतली. प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी संस्थाप्रमुख आणि महिला शिक्षिकेला निलंबित केले.
मिळालेल्या माहितीनुसार , गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, मुख्याध्यापकांची ही वृत्ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. जेव्हा त्याला आधी असे न करण्यास सांगितले गेले तेव्हा तो त्याच्या पदाचा आणि उच्चस्तरीय संपर्कांचा वापर करून धमक्या देत असे. एवढेच नाही तर तो गावकऱ्यांना घाबरवत असे. माहितीनुसार, शाळेच्या मुख्याध्यापकांचे हे कृत्य टिपण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतः शाळेत एक गुप्त कॅमेरा बसवला होता. यावेळी, या प्रकरणाची माहिती नसलेल्या मुख्याध्यापकाचे घाणेरडे कृत्य उघड झाले.
प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षण अधिकारी राजेंद्र कुमार शर्मा म्हणाले की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ सालेरा उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद नाथ व्यास आणि एका महिला शिक्षिकेचा होता. या प्रकरणात, संस्थाप्रमुख आणि शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.