तरुणांना त्यांचा प्रेम मिळवायचं असेल किंवा त्यांना त्यांचा त्यांचा प्रियकराला किंवा प्रियसीला वंश मध्ये करायचा असेल तर एक खास मंत्र हर्षा रिचारिया नावाच्या एका साध्वीने सांगितला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा सुरू असून सध्या देशभरात त्याचीच चर्चा सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या कुंभमेळ्यासाठी लोक येत आहेत. या कुंभमेळ्याच्या फोटोही बरेच व्हायरल झाले असून त्यामध्ये सहभागी झालेल्या सुंदर साध्वीची देखील सध्या खूप चर्चा आहे, तिचेही फोटो सगळीकडे व्हायरल झालेत. हर्षा रिछारिया असं चं नाव असून सर्वत्र तिचीच चर्चा आहे. याच सुंदर साध्वीने आता तरूणांना त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी एक खास मंत्र दिला असून तो व्हिडीओही बराच व्हायरल झालायं.
हर्षा रिचारिया नावाच्या या महिलेचे तिच्या @host_harsha नावाच्या इंस्टाग्राम आयडीवर तिने हा विडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हर्षा म्हणते, ‘हर-हर महादेव, जय श्री राम. मला अनेक जण मेसेज करत आहेत की आम्हाला आमचं प्रेम वश करायचं आहे. म्हणजे ती व्यक्ती आमच्याशी लग्न करेल आणि कधीच दूर जाणार नाही. त्यासाठी काय करावं, असा सवाल विचारत आहेत. तर मी आज एक असा मंत्र सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचं प्रेम, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड यांना वश करू शकता, ते तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, तुमची प्रत्येक गोष्ट ते एकतील’ असं तिने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, ‘ आणि तो मंत्र म्हणजे – ऊं गिली गिली छू… ऊं फट् स्वाहा. या मंत्राचा तुम्ही पुढले 11 दिवस, दिवसातून 1008 वेळा जप करा. जर 12 व्या दिवसांपर्यंत तुम्हाला काहीच रिझल्ट मिळाला नाही तर परत कमेंट करा. मी नवा मंत्र सांगेन. ‘ हे एक मजेशीर रील असल्याचं अखेरीस यातून अनेकांना समजलं आणि असा खरा कोणताही मंत्र नाही, हर्षा फक्त मजा करत होती, बाकी काही नाही.