धक्कादायक ! शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या,  कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
देशात गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून कधी कधी  काही वाद इतके विकोपाला जातात की त्यातून मोठं मोठे गुन्हे सुद्धा घडतात. दरम्यान, छत्तीसगड येथे एक धक्कादायक प्रकरण  उघडकीस आले आहे. जमीनीच्या वादातून आजतक या खाजगी वाहिनीचे जिल्हा पत्रकार संतोष कुमार टोपो यांच्या संपूर्ण कुटुंबाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचे उघड झाली आहे. आरोपी काकांनी संतोषसह त्याच्या आई-वडीलांना आणि भावाला कुऱ्हाडीच्या सहाय्याने कापून काढले. छत्तीसगड मधील सूरजपूर जिल्ह्यात शुक्रवारी संपत्तीच्या वादातून  एका  जिल्हा रिपोर्टर संतोष कुमार टोपो यांच्या संपूर्ण कुटुंबाची निर्घृण पद्धतीने कुटुंबातील व्यक्तीने संपविले आहे.या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पत्रकार संतोष यांच्या आई-वडील आणि भावाचा देखील समावेश आहे. ही घटना दुपारी एकच्या सुमारास जगन्नाथपुर येथील खरगवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आई-वडील शेतात काम करीत असताना ही घटना घडली. संतोष यांच्या कुटुंबात संपत्तीवरुन गेली अनेक वर्षे वाद सुरु होता. शनिवारी शेतात या वादाचे खूनी संघर्षात परिवर्तन झाले. संतोष यांच्या काकांनी त्याचे आई-वडील धारदार शस्राने हल्ला केला. या हल्ल्यात संतोष आई-वडील आणि भावाचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने कुऱ्हाडीने त्यांना निर्दयपणे ठार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जगन्नाथपूर गावात पारंपारिक जमीनीवरील शेतीवरुन कुटुंबात जोरदार वाद झाला. उमेश टोपो , नरेश टोपो ( ३० वर्षे ) त्याची आई बसंती टोपो ( ५५ वर्ष ) आणि वडील माघे टोपो ( ५७ वर्षे ) हे या वादग्रस्त शेतीत काम करायला पोहचले. या दरम्यान, दुपारी एक वाजता दुपारी १ वाजता माघे टोपो याचे भावाचे कुटुंबातील सात ते आठ लोक येथे पोहचले. यावेळी शेत जमीन कसण्यावरुन जोरदार वाद झाले. त्यानंतर शब्दाला शब्द वाढत जाऊन हिंसक झडप झाली. दुसऱ्या गटाने माघे टोपो याच्या कुटुंबावर कुऱ्हाडी आणि लाठ्या काट्यांनी हल्ला केला. डोक्यात गंभीर जखमा झाल्याने बसंती टोपो आणि नरेश टोपो यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर माघे टोपो यांना गंभीर जखमी अवस्थेत अंबिकापूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी त्यांचा मृ्त्यू झाला. हल्ल्यानंतर माघे टोपो यांचा दुसरा मुलगा उमेश टोपो हा सुदैवाने पळुन गेल्याने त्याचे प्राण वाचले आणि त्याने संपूर्ण गावाला या हत्याकांडीची  माहिती दिली.

दरम्यान , ज्या जमीनीमुळे हे भांडण झाले त्या जमीनीवर आधी आरोपीचे कुटुंब शेती करीत होते. या प्रकरणावरुन एसडीएम कोर्ट प्रतापपूर येथे प्रकरण प्रलंबित होते. त्यानंतर कोर्टाने मृत व्यक्ती व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला होता.


इतर बातम्या
Join Whatsapp Group