दुर्दैवी ! पतंग उडवताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू
दुर्दैवी ! पतंग उडवताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
 एका १२ वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहीरीत पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात आज दि. १० जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ येथील बिष्णू थापा या मृत मुलीचे कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसरात राहत आहे. दरम्यान ,  आज सकाळी ८.३० वाजेदरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती. पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे असलेल्या एका विहीरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली. तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला. 

त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहीरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहीरीतून बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका चालकांनी तीला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तीला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group