देशासह राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून, हत्ये सारखे गंभीर गुन्हे सर्रास पाने घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. दरदिवशी अशा घटना ऐकायला मिळत असतात. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार करून एका तरुणाची हत्या करण्यात इलायची खबळजनक घटना घडली आहे.
भुसावळ शहरात एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी हॉटेलमध्ये घुसून तरुणावर गोळीबार केला. आरोपींनी ज्याच्यावर गोळ्या झाडल्या तो तरुण तिथे चहा पीत होता. चहा पीत असतानाच आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी हॉटेलमध्ये असलेले इतर नागरीक भयभीत झाले. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. तिथे असलेली माणसं सैरावैरा पळू लागली. आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर तिथून पळ काढला. यावेळी एका तरुणाने हवेत गोळीबारही केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. अज्ञात चार आरोपी हे हॉटेलमध्ये प्रवेश करतात आणि तरुणावर गोळीबार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. यावेळी आलेल्या सर्व मारेकऱ्यांकडे पिस्तूल असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. या गोळीबारानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना एक जण हवेत फायरिंग करत पिस्तूल दाखवत बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत आहे. आरोपींनी वैयक्तिक जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेवेळी 4 ते 5 राऊंड फायर झाल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.
भुसावळ शहरात सकाळी सात वाजेच्या सुमारास चार अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून भुसावळ मधील जाम मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीज जवळील हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. तेहरीम नासिर शेख असे गोळीबार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे. तसेच पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे का? याबाबत देखील चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.