नाशिकच्या निफाड तालुक्यात  भूत ? ''त्या'' घटनेचं सत्य काय
नाशिकच्या निफाड तालुक्यात भूत ? ''त्या'' घटनेचं सत्य काय
img
दैनिक भ्रमर
नाशिकमधील निफाड तालुक्यात सध्या भीतीचं वातावरण दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील काही भागांमध्ये चक्क भूत दिसल्याची अफवा परसल्याने सध्या काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा पसरली आहे, त्याचबरोबर एका वाहन चालकाला मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे आजुबाजूच्या परिसरांमध्ये भीतीची वातावरण पसरलं आहे.

शिरवाडे ते धामोरी रात्रीच्या वेळी त्या नदीजवळच्या सुनसान रस्त्यावर वाहनचालकाच्या समोर अचानक एक स्त्री आली अन तिने वाहन चालकास मारहाण केली असल्याची माहिती आहे. या स्त्रीचे आणि कथित भुताचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधील महिलेच्या भेसूर रडण्यानं काळजात धडकी भरतेय. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास लोक घाबरत आहेत.

दरम्यान , शिरवाडे ते धामोरी रस्त्यावरील या प्रकराची अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दखल घेतली. भूत असं काही या जगात अस्तित्वातच नाहीये. भूत लोकांच्या मनात असते. त्यामुळे लोकांनी घाबरु नये असं आवाहन अंनिसनं केलंय.


या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. जगामध्ये भूत अस्तित्वात नसते. तरीही त्याची भिती दाखवली जाते कारण भूत हे मनात असते. लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलं आहे. फोटोचे निरक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते. 

सदर चित्रफित आणि फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते. शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत असल्याचे देखील चर्चा आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावशेच्या रात्री सदर ठिकाणी उपस्थित राहुन दाखविणार आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भुताची जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि मनातील भीती काढून टाकणं गरजेचं आहे. तसेच अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group