धक्कादायक  !  दुचाकी चालवताना तरुणाचा मांजाने गळा कापला, तब्बल 75 टाके , नाशिकमधील घटना
धक्कादायक ! दुचाकी चालवताना तरुणाचा मांजाने गळा कापला, तब्बल 75 टाके , नाशिकमधील घटना
img
दैनिक भ्रमर
 नायलॉन मांजामुळे गळे कापण्याचा घटनेत वाढ होत आहे. हा मांजा अतिशय घटक असून या घटनांमुळे अनेक घटना घडत आहेत
 दरम्यान, नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी घातलेली असताना देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू असल्याच पाहायला मिळत आहे.  या नायलॉन मांजामुळे एका २५ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. या नायलॉन मांजामुळे तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडले आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे.

या घटनेत मुशरन सय्यदचा गळा चिरला गेल्याने त्याच्या गळ्याला 75 टाके पडले आहेत. त्याच्यावर नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  सुदैवाने मुशरन सय्यद हा 25 वर्षीय तरुण दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दारातून परत आलाय. या नायलॉन मांजामुळे त्याच्या गळ्यापासून ते आतमध्ये असलेली मुख्य रक्तस्त्राव करणारी वाहिनीला चिर पडली आहे. मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याला आयुष्य मिळालं आहे. हा तरुण किती प्रमाणात गंभीर जखमी झाला, त्याच्यावर कशा पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली, याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,   नाशिक शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद हा तरुण दुचाकीवरून घरी येत होता. त्यावेळी त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला आणि तिथेच चिरला गेला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावरच कोसळला. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी काही अडचणींमुळे त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याला आणखी एका दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला जीवदान मिळाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group