आजकाल कुठे काय घडेल सांगताच येत नाही आणि काही घटनांना तर ऐकावं ते नवलच असं म्हणायची वेळ येते अशी एक घटना उघडकीस आली आहे. मुलासाठी पसंत केलेल्या मुलीसोबत मुलाच्या वडिलांनीच लग्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर मानसिक धक्का बसलेल्या तरुणाने संन्यासी राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुलगा सध्या वडिलांपासून वेगळा राहतो आहे. सांपूर्ण परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , नाशिकच्या सिडको भागातील हा तरुण वडिलांसोबत राहतो. मुलाचे लग्न करायचे म्हणून मुली बगण्याचा कार्यक्रम सुरु केला आणि मुलाला एक मुलगी पसंत पडली पण मात्र या मुलीला बघताच मुलाचे वडिलच तिच्या प्रेमात पडले. वडिलांनाही पत्नी नसल्यामुळे त्यांच्या मनात प्रेमाचा पाझर फुटला.
एकीकडे घरच्यांनी मुलाच्या लग्नाची तारीख ठरवली, त्यानंतर दोन्ही कुटुंबाकडून लग्न सोहळ्याची तयारी सुरू झाली. लग्नाची तयारी सुरू असतानाच मुलाच्या वडिलांचे मुलीकडे आकर्षण वाढू लागलं, मुलगीही भावी पतीच्या वडिलांकडे आकर्षित झालं. वडिलांनी सुनेला पळवून नेत, तिच्यासोबत लग्न केलं आणि तिला घरी आणलं.जी मुलगी बायको म्हणून घरी येणार होती, त्याच मुलीला आई म्हणायची वेळ आल्यामुळे हा मुलगा प्रचंड मानसिक धक्क्यात गेला आहे.