शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा !  कृषी मंत्र्यांनी  घेतला ''हा'' निर्णय !
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! कृषी मंत्र्यांनी घेतला ''हा'' निर्णय !
img
दैनिक भ्रमर
शेतकऱ्यांचा हितासाठी राज्यसरकारडून नेहमी वेगेवेगळे निर्णय घेतले जातात. शेती संदर्भातील सर्व  योजना  आणि अनुदानाच्या  माहिती शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध व्हाव्या यासाठी पुन्हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही  मोठी घोषणा केली असून शेती संदर्भातील सर्व लाभाच्या आणि अनुदान योजनांसाठी अजित पोर्टल सुरू केले जाणार आहे. अशी माहिती कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे. शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरामध्ये मंत्री कोकाटे यांनी ही घोषणा केली आहे.

सध्या राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना तसेच कृषी यंत्र अनुदान. याचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून महाडीबीटी पोर्टल सुरू आहे. या पोर्टलच्या अंतर्गत शेतकरी आपले अर्ज करत असतात. या पोर्टल अंतर्गत केले जाणारे अर्जाची निवड करून शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. अशातच आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान मंत्री कोकाटे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर महाडीबीटी पोर्टल बंद होणार का? असा प्रश्न पडला आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु अजित पोर्टल सुरू झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टल बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group