चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ! बीसीसीआय निवड समितीचा निर्णय झाला ! ''या'' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ! बीसीसीआय निवड समितीचा निर्णय झाला ! ''या'' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा
img
दैनिक भ्रमर
 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्वच अत्यंत आतुरतेने या स्पर्धेची वाट बघत आहे. याच दरम्यान आता भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केव्हा होणार? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बीसीसीआय निवड समिती शनिवारी 18 जानेवारी रोजी इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करणार असल्याचं समोर आलं आहे. 

तसेच, मीडिया रिपोर्ट्नुसार, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही पत्रकार परिषदेद्वारे संघ जाहीर करणार आहेत. 18 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. आता निवड समितीने कोणत्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे? यासाठी शनिवारची वाट पाहावी लागणार आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर करण्याची 12 जानेवारी ही अंतिम मुदत होती. मात्र जसप्रीत बुमराह याची दुखापत आणि इतर कारणांमुळे निवड समितीने संघ जाहीर करण्याासाठी आयसीसीकडे वाढीव मुदत मागितली होती. त्यानंतर 18 किंवा 19 जानेवारीला संघ जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यानुसार आता 18 जानेवारीला निवड समितीच्या बैठकीनंतर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध ज्यांना संधी मिळेल तेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात असतील, असंही म्हटलं जात आहे. आता निवड समिती काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

भारतीय संघाचं वेळापत्रक

इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई

इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई

सेमी फायनल-1, 4 मार्च, दुबई

सेमी फायनल-2, 5 मार्च, लाहोर

अंतिम सामना, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई

10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)

इतर बातम्या
Join Whatsapp Group