10 हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
10 हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
img
दैनिक भ्रमर
10 हजार रुपयांची लाच घेताना देवळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.कैलास यशवंत जगताप (वय 54, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  देवळा पोलीस स्टेशन वर्ग -3मु . पोस्ट  - मुंजवाड (ग्रामपंचायत समोर) तालुका - सटाणा जिल्हा  नाशिक असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की,  तक्रारदार यांच्यावर देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता . त्या  गुन्ह्यात अटक न करता नोटीस अदा करण्याकामी तसेच गुन्ह्यात मदत करण्याकामी जगताप यांनी 20,000 रुपयाची मागणी केली. त्यापैकी 10,000 घेतांना व यापूर्वी 2 लाख पाच हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून रंगेहाथ मिळून आला. म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा आहे. हा गुन्हा देवळा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा  वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, पोहवा सुनील पवार, पोहवा संदीप वणवे, पोहवा योगेश साळवे, चालक परशुराम जाधव यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group