लाडकी बहीण योजना : अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली ''ही''  माहिती
लाडकी बहीण योजना : अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली ''ही'' माहिती
img
दैनिक भ्रमर
महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. दरम्यान महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत या योजनेचा फायदाही झाला. दरम्यान,  निवडणूक झाल्यानंतर अपात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहि‍णींना दिलेली रक्कम परत घेणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सुरु असेल्या वादावरूनही आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचं मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही. इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

“कोणतीही योजना घ्या, त्या योजनांची दरवर्षी फेरतपासणी केली जाते. ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘गॅस सबसिडी’, ‘नमो शेतकरी योजना’, या अशा सर्व योजनांची वर्षभरातून एकदातरी फेरतपासणी केली जातेच. ही काय नवीन किंवा जगावेगळी प्रक्रिया नाही. लाडकी बहीण योजनेचं हे पहिलंच वर्ष असल्याने याबाबत असा संभ्रम तयार करण्यात येतोय. आतापर्यंत विविध विभागातील थेट लाभांच्या योजनेचं फेरतपासणी करणं ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात काही वेगळं आहे,असं काही नाही”, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

“आम्ही अजून परस्पर कोणत्याही लाभार्थ्याचे पैसे परत घेतलेले नाहीत. तसेच ज्या महिलांनी स्वंयइच्छेने आणि विविध कारणांमुळे योजनेसाठी पात्र नसल्याचं आम्हाला कळवलं आहे, हा भाग वेगळा झाला. मात्र आम्ही या महिलांकडूनही पैसे परत घेतलेले नाहीत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group