3 वर्षीय समर्थाच्या नावी अनेक विक्रम, इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
3 वर्षीय समर्थाच्या नावी अनेक विक्रम, इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
img
दैनिक भ्रमर
म्हणतात ना काहींमध्ये टायलेन्ट जन्मतः असतो. हेच एका चिमुकलीने सिद्ध करून दाखवले आहे.  ह्या  चिमुकलीच नाव आहे समर्था महालक्ष्मी सक्रोल.   
माटुंग्यातील लेबर कॅम्पमधील 3 वर्षाच्या समर्था महालक्ष्मी सक्रोला या चिमुरडीने शिक्षण श्रेणीमध्ये सर्वात कमी वयात अनेक इतिहास रचले आहेत. तसेच कमी वयात अनेक पुरस्कार सुद्धा मिळवले आहेत.

समर्था सक्रोला या चिमुकलीचा जन्म 26 ऑगस्ट 2021 रोजी झाला. समर्थाची प्रतिभा तिच्या जन्मापासूनच दिसूलागली. जेव्हा ती 2 महिने 5 दिवसांची होती, तिच्या शरीराचे हात आणि पाय सतत हालचाल करत होते. तसेचचेहऱ्यावरील हावभाव सतत बदलत राहिले.

यानंतर ती जसजशी मोठी होत गेली, तसतशी प्रत्येक महिन्याला तिच्यातील समजूतदारपणा, तसेच काही ना काही वेगळेपण दिसून येत होते. तिच्यातील हे सर्व टॅलेंट पाहून तिच्या आईने तिला 5 महिन्यांची असतानाप्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यानंतर समर्थाने ऑनलाईन स्पर्धेत राष्ट्रगीत, ए टू झेड अल्फाबेट, अवयवांची नावे, 10 फळे, 5 भाज्या, वाहनांची नावे, 14 प्राण्यांची नावे, 2 इंग्रजी कविता, 6 पक्षांची नावे, भारतीय चलनातील नोटा आणि कॉइन, राष्ट्री य पक्षी, राष्ट्री य फळाच्या नावासह राष्ट्री य फुलाचे नाव झटपट बोलून दाखविले.

या पुरस्काराने सन्मानित - तिचे थक्क करणारे टॅलेंट पाहून आयडब्लूआरने इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचे नाव नोंदनों विले गेले. याचबरोबर
प्रोफाइल ऑफ इंटरनॅशनल टॅलेंट अँड इंटेल लॅक्टऊल्स आणि इंडियास वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार, असे अनेकपुरस्कार समर्थाला मिळाले आहेत. याचसोबत महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा समर्थाला पुरस्कार देऊन गौरवण्यातआले. भारतातील सर्वात तरुण प्रभावशाली नॅशनल आयकॉन अवॉर्डनेही समर्थाला सन्मानित करण्यात आले आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group