शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून अध्यक्षांनी समस्यांकडे लक्ष द्यावे, कर्मचारी संघटनेची मागणी
शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून अध्यक्षांनी समस्यांकडे लक्ष द्यावे, कर्मचारी संघटनेची मागणी
img
दैनिक भ्रमर
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या 304 व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली. 
दरम्यान , शिवनेरी सुंदरीऐवजी समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटीचे कर्मचारी हे ब्रँड ॲम्बेसेडर व सुंदरी पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समंस्स्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

 शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याचा निर्णय परिस्थितीला अनुसरून नाही.आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे असून तसे केल्यास उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील असे बरगे यांनी म्हटले.

दरम्यान, शिवनेरी बसची सेवा ही एसटी महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा आहे. साधारण 120 इलेक्ट्रिक व डिझेल वरील बस या सेवेत आहेत. एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सेवेचे सरासरी भारमान हे 80 टक्के इतके आहे. या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे, या पुरती मर्यादित ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे.आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.

एसटी कर्मचारी व अधिकारी अत्यंत हे चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचविले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य वाढून उत्पन्न वाढेल व ते ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरी पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील यात शंका नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group