नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा हात धरून तिचा विनयभंग करणार्या खासगी क्लासच्या शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विद्यार्थिनी ही कॅनडा कॉनर येथे असलेल्या फिजिक्स या विषयाच्या क्लाससाठी गेली होती. त्यावेळी क्लासमधील शिक्षक दिनेश जाधव याने पीडिता ही क्लासमध्ये एकटीच असल्याचा फायदा घेऊन तिला शिकवीत असताना तिचा हात ओढला. पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी दिनेश जाधव या शिक्षकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार माळोदे करीत आहेत.