नाशिक :- गुंड विरोधी पथकाने एमजी रोडवरील प्रधान पार्कमध्ये छापा टाकत 6 लाख रुपयांचा अॅपल कंपनीचा बनावट माल जप्त केला आहे.आज कुंदन गुलाबराव बेलोसे यांनी प्रधान पार्क कॉम्प्लेक्स, एम.जी. रोड नाशिक येथील मोबाईल विक्रीच्या दुकानांमध्ये अॅपल कंपनीचे अॅक्सेसरीजचे बनावटीकरुन घेतलेले अॅपल वे अॅक्सेसरीज अनाधिकृतपणे उपकरणांची विक्री होत असल्याची तकार दिली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, यांच्या सुचनेनुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुंडा विरोधी पथकाला नाशिक शहरात कॉपी राइट अॅक्ट खाली कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने आज प्रधान पार्क कॉम्प्लेक्स, एम.जी. रोड, नाशिक येथे दुपारी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ, सगळे, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, अशोक अघाव, राजेश राठोड, सुनिता कवडे यांच्या पथकाने अंबिका मोबाईल शॉपचे मालक देवासी मेसाराम भल्लाराम, (वय २८, रा. फ्लॅट नं २०१, दिपज्योती आपार्ट, चिंचवन रोड, मालेगाव स्टैंड, पंचवटी, नाशिक) यांच्या ताब्यातुन १,८३,५०० रुपये किंमतीचा बनावट माल जप्त केला.
तसेच , शिव मोबाईल शॉपचे मालक सुरेश पिरारामजी चौधरी (वय २६, हल्ली रा. फ्लॅट नं ०७, यशवंत हाईट, हिरावाडी, पंचवटी, नाशिक मुळ रा. अलडी, जि. जालोर, राज्य-राजस्थान) यांच्या ताब्यातुन ६७,५०० रुपये किंमतीचा बनावट माल, युनिक मोबाईल शॉपचे मालक तेजस संलीय कोल्हे, (वय २४, रा. दुर्गा नगर, अमृतधाम, के के वाघ कॉलेजच्या मागे, पंचवटी, नाशिक) यांच्या ताब्यातुन १,०५,५०० रुपये किंमतीचा बनावट माल विनस मोबाईल शॉपचे मालक दिपक सुरासिंग वाघ (वय ५३, रा. प्लॉट नं ४६, शिवाजीनगर, सातपुर, नाशिक) यांच्या ताब्यातुन २,१२,५०० रुपये किंमतीचा बनावट माल असे एकुण APPLE Mobile चे साहित्य व मोबाईल बैंककव्हर, अॅडप्टर, एअर पॉड इत्यादी उत्पादनाची हुबेहुब नक्कल व रंगसंगती असलेला एकुण ५,६९,००० किंमतीचा माल जप्त केला.
वरील चार आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ, सगळे, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, अशोक अधाव, राजेश राठोड, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली.