देशातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून कायद्याचा धाक आता गुंडखोरांना राहिलेला नाही. त्यामुळे देशातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे. दार दिवशी अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतात तसेच हल्ली या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. छत्तीसगडमधील बीजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार , त्यांचे डोक्यावर 15 ठिकाणी जखमा आढळून आल्या असून लिव्हरचे चार तुकडे झाले होते. तसेच त्यांची मान तुटलेली होती आणि हृदयालाही जखमा झाल्या होत्या. पोस्टमार्टेम अहवालातून ही माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी ठेकेदाराला अटक मुकेश चंद्राकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली ठेकेदार सुरेश चंद्राकर याला अटक करण्यात आली आहे. हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने त्याला हैद्राबाद येथून आज सकाळी अटक केली. त्याच्या पत्नीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. का करण्यात आली हत्या? पत्रकार मुकेश यांनी ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. सुरेशने बस्तरमध्ये 120 कोटींची रस्त्याची कामे मिळाली होती. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता नसल्याचे वृत्त मुकेश यांनी दिले होते. पण त्यानंतर मुकेश हे बेपत्ता झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी एका सेप्टिक टँकमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. एक जानेवीरापासून ते बेपत्ता होते.
दरम्यान, डॉक्टरांनी ही अत्यंत क्रुर हत्या असल्याचे म्हटले आहे. आपल्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अशी हत्या पाहिल्याचे त्यांनी सांगितले. मुकेश यांची दोघांनी किंवा त्याहून अधिक जणांनी हत्या केली असावी, असा दावाही डॉक्टरांनी केला आहे.
तपासामध्ये मुकेश यांना ठेकेदार चंद्राकराच्या भावाने शेवटचा कॉल केल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांचा फोन बंद होता. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ठेकेदाराच्या भावाने मुकेश यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. लोखंडी सळईने जबर मारहण केल्याने मुकेश यांचा मृत्यू झाला होता.