दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक धक्कादायक अशा घटना समोर येत आहेत. अशीच एक हादरवानरी घटना छत्रपती संभाजी नगर मधून समोर आली आहे. 17 वर्षांच्या मुलीची 200 फूट डोंगरावरून खाली ढकलून हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानेच तिला डोंगरावरून ढकलून दिलं आहे.
अंबड तालुक्यातील शहागडची मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवलं होतं.
काकाच्या मुलाने या अल्पवयीन मुलीला गोड बोलून खावडा डोंगरावर नेलं आणि तिकडून त्याने बहिणीलाच खाली ढकललं. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.