दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे. हेत्येसारख्या गंभीर गुन्हेही सर्रास पने केले जातात. आता अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील मोईन कुटुंबातील आई-वडील आणि तिन्ही मुलांची हत्या चुलत्यांनी साडेचार लाख रुपयांसाठी केली. गुरुवारी झालेल्या या हत्याकांडचा पोस्टमॉर्टन अहवाल आला आहे.
मेरठ महानगरमधील लिसाडी गेट भागात सोहेल गार्डन कॉलनीमध्ये मिस्त्री मोईन त्यांची पत्नी आसमा आणि 3 मुली अक्सा (8), अजीजा (4) अफ्सा (1) एका भाड्याच्या खोलीत राहत होते. गुरुवारी त्यांच्या घरात पाचही जणांचे मृतदेह मिळाले. पती-पत्नीचे मृतदेह चादरीत होते तर तिन्ही मुलांचे मृतदेह एका बॉक्समध्ये टाकले होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ उडाली. या हत्याकांडचा पोस्टमॉर्टन अहवाल आला आहे. त्यात अगदी क्रूरपणे या हत्या घडवल्याचे समोर आले आहे. पोस्टमॉर्टन अहवालात मोईन आणि आसमा यांच्यावर लोखंडी रॉडने दहा ते बारा वार केले गेले. त्यानंतर दगड कापणारी कटर मशीनने त्यांचा गळा कापण्यात आल्याचे म्हटले आहे. 8 वर्षीय अक्साच्या डोक्यावर 2 पेक्षा जास्त वार केले गेले. 4 वर्षीय अजीजा हिच्या डोक्यावर वार करण्यात आले. दोन्ही मुलींच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. यामुळे त्यांच्या डोक्याची हाडे तुटली. आरोपींना एक वर्षीय मुलीचा गळा दाबून तिचा खून केला.
हत्येपूर्वी आरोपींनी परिवाराच्या सर्व सदस्यांना अंमली पदार्थ खाऊ घातल्याचा संशय डॉक्टरांना आहे. परंतु पोस्टमॉर्टन रिपोर्टमध्ये त्यासंदर्भात काहीच उल्लेख नाही. त्याचा विसरा तपासणीसाठी गाजियाबादमध्ये पाठवला आहे. या प्रकरणी मोइन याचे चुलत भाऊ तसलीम, वहिणी नजराना, दुसरा चुलत भाऊ नईन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उधारीच्या साडेचार लाखांसाठी त्यांनी ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे.
मोईन यांनी घेतलेले साडेचार लाख रुपये परत केले नाही, त्यामुळे संपूर्ण परिवाराची हत्या तसलीम, नजराना आणि नईन यांनी केली. या प्रकरणी तसलीम आणि नजराना यांना अटक करण्यात आली आहे. परंतु नईम फारर आहे. त्याच्यावर 25 हजारांचे बक्षिस जाहीर केले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.