मुंबईतील चेंबूरमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चुलत्याने १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध टाकून बलात्कार केला. चेंबूरमधील वाशीनाका परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एवढंच नाही तर नराधम चुलत्याने अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. नराधम चुलत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चेंबूरमध्ये १५ वर्षीय मुलीच्या शितपेयात गुंगिचं औषध टाकून बेशुद्धावस्थेत चुलत काकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल केला. वाशीनाका चेंबूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. नराधम काकाला केली आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(१), ६५(१) आणि १२३ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४,८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या. कपडे घेऊन देण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मैत्रिणीच्या घरी बोलवले. त्यानंतर शितापेयात गुंगिकारक औषध पाजले. मुलगी बेशुद्ध असताना चुलत्याने बलात्कार केला. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.