जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील
जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील "या" नेत्याचा मोठा दावा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. जयंत पाटलासाठी हीच ती योग्य वेळ, आता राम कृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगीरी असंही अमोल मिटकरी म्हणाले.

सभागृहात बोलताना जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा नियम असल्याचं म्हटलं होतं. त्यावर अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील आता राष्ट्रवादीत येतील असा दावा केला आहे. 

राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी बोलताना 'दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला. 

अमोल मिटकरी म्हणाले की, "जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ते असतील. शरद पवार साहेबांचं आवडीचं गाणं आहे 'तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो', त्यानुसार मे इतना मुस्कुरा रहा हू दिल मे खुशी छुपा रहा हू. जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत." 

गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या 10 कॅबिनेट बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं. जयंत पाटील त्यावेळी हसले होते असंही अमोल मिटकरी म्हणाले. 

अजितदादा-जयंत पाटलांमध्ये टोलेबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मिश्किल संवाद विधानसभेत बघायला मिळाला. बघा किती बारीक लक्ष आहे असं जयंत पाटील अजितदादांना उद्देशून म्हणाले. तर बारीक लक्ष देऊन काय फायदा? तुम्ही प्रतिसाद देत नाही असा मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला. दोन्ही नेत्यांच्या या मिश्किल वक्तव्यानं वपिधिमंडळात एकच हशा पिकला.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group