शरद पवारांना धक्का !  '' हा'' बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार
शरद पवारांना धक्का ! '' हा'' बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार
img
दैनिक भ्रमर
विधासभा निवडणुकीत महायुती सरकारचा दणदणीत विजय झाला असून महाविकस आघाडीच्या हाती मात्र निराशा आली आहे. गुरुवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान त्यानंतर आता राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. 

विधासभा निवडणुकीत शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले. असं असताना निवडून झाल्यानंतर खान्देशातील बडा नेता आता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. जवळपास 5 हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गुलाबराव देवकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

अजित पवार गटात जाणार असल्याचं गुलाबराव देवकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली. सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.

तसेच, चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं असं सांगितलं होतं. अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातले तसेच जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, असं गुलाबराव देवकर यांनी सांगितलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group