महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणूक काळात एक पुस्तक प्रकाशित होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नवं पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ असं अनिल देशमुख यांच्या पुस्तकाचं नाव आहे. अशात आता या पुस्तकाचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचं कव्हर पेज समोर आलं आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काही २० प्रकरणांपैकी एका प्रकरणात, अनिल देशमुख यांनी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने केंद्रीय यंत्रणा ईडीविरुद्ध गंभीर आरोप लावले आहेत. या प्रकरणाचे नाव आहे : "ईडी - वरून प्रेशर आहे," ज्यात देशमुख यांनी २०२१ सालच्या दिवाळीच्या दिवशी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची अटक कशी झाली, याचा उल्लेख केला आहे.
देशमुख यांच्या या पुस्तकात त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या घटनांचा उलगडा होऊ शकतो, जसे की मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवणे, मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याशी संबंधित माहिती यात असू शकते.
देशमुख यांच्या या पुस्तकामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर पुस्तकाच्या प्रकाशनाची वेळही चर्चेचा विषय बनली आहे. माध्यमांवर सध्या या पुस्काचं कव्हर पेज समोर आलं आहे. राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा अशी टॅगलाईन यावर लिहिण्यात आली आहे.
केंद्रीय यंत्रणेचा वापर करत विरोधकांना निस्तनाबुध करण्याची नवीन संस्कृती महाराष्ट्रात जन्माला आली. आशा पध्दतीनं हे कवर पेज सजवलं आहे. त्यामुळे या पुस्तकातून कोणत्या गोष्टींचे खुलासे होणार हे पहावं लागणार आहे.