ननाशीत पिता पुत्राने धडापासून शिर छाटुन गाठली पोलीस चौकी
ननाशीत पिता पुत्राने धडापासून शिर छाटुन गाठली पोलीस चौकी
img
दैनिक भ्रमर

 पेठ  - दिडोंरी तालुक्यातील  ननाशी येथे आज दि. (१) रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ननाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर ननाशी पेठ बाऱ्हे रोड लगत ही निर्घृण हत्या करण्यात आली. 

गुलाब रामचंद्र वाघमारे (वय ३५, रा.ननाशी, वाघमारे गल्ली) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून आरोपी सुरेश बोके व रामदास उर्फ रामड्या बोके या पिता पुत्रांनी कोयता व कुऱ्हाडीने गुलाब याचे शिर छाटुन घटनास्थळा पासुन नजिकच असलेल्या ननाशी औटपोस्ट पोलीस चौकीत मुंडके घेऊन आरोपी हत्यारांसह हजर झाले.

सुरेश बोके याची मुलगी पळुन गेल्याने तीस पळुन जाण्यास मयत गुलाब  वाघमारे याने मदत केली असल्याच्या संशयावरून त्यास कु-हाड व कोयत्याने मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून  वेगळे करून त्यास जीवे ठार  मारले व आम्ही त्याचा कायमचा काटा काढला तुम्हाला काय करायचे ते करा असे फिर्यादीस दमदाटी केली. मयताची पत्नी मिनाबाई वाघमारे हिने पेठ पोलिसांत या दोघां विरुद्ध फिर्याद  दिली असुन गुन्हा नोंद करण्यात  आला आहे. 

याबाबत  अधिक  तपास  पोलीस निरीक्षक डी एम  गोदंके यांचे मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस  करीत आहेत. दरम्यान ननाशी गावात तणावाचे वातावरण असुन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group