नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली होती. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मुहूर्त मिळाला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मागचे २ आठवडे कोर्टापुढे हे प्रकरण येत होते, मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नव्हती. अखेर आता २४ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. २ दिवसांपूर्वी आलेल्या कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत हे प्रकरण २२ ऑक्टोबर रोजी दाखवलं होत मात्र आता यावर २४ तारखेला सुनावणी होणार आहे.
प्रकरणात सुनावणीत काय घडलं?
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही, म्हणून या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. यावर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेत आहेत. सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलं आहे.