बापरे! सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर? व्हायरल व्हिडीओ मुळं खळबळ
बापरे! सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर? व्हायरल व्हिडीओ मुळं खळबळ
img
Dipali Ghadwaje
जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंचा प्रसाद बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरली जाते, असा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली. तिरूपती बालाजी मंदिरातली प्रसादावरून संपूर्ण देशात रान पेटलंय. या प्रसादाच्या मुद्यावरून वाद सुरू असतानाचा आता मुंबईतील विख्यात सिद्धीविनायक मंदिरीातील प्रसादही खूप चर्चेत आला आहे. सिद्धीविनायक मंदिरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

सिद्धिविनायक मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांचा वावर असल्याचा दावा करणारा कथित व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. दरम्यान या मुद्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.

प्रशासनाचं म्हणणं काय ?

मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला, यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रशासनाने मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ मंदिरबाहेरचाही असू शकतो, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते, असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं.

दरम्यान , हा व्हायरल फोटो आणि व्हिडिओची यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group