"निवडणुकीत यश मिळू दे" ; सिद्धिविनायकाच्या चरणी अजित पवार गटाचे साकडं....
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष राज्यसभा निवडणुकांवर लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कमाला लागले आहे. भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा जिंकू, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावा असं साकडं घातल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.  

आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिध्दीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत. शेवटी जनता - जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. 14 जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

विधान परिषदेसाठी आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करणार : अजित पवार

अजित पवार म्हणाले,  आज अंगारकीचा अतिशय चांगला दिवस आहे. या दिवशी आपण चांगली सुरुवात करत असतो. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या कोणत्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहचवणे आणि पुढे वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणे आणि हे करताना मुंबईत असल्याने आम्ही सिध्दीविनायकचे दर्शन घेत आहोत. विधान परिषदेच्या नाही तर विधानसभेच्या निमित्ताने तसेच आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रचाराची सुरुवात करत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group